महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मार्च) : चंद्रकांत पाटील यांनी चिंचवड पोटनिवडणुकीत विजयी झाल्याबद्दल स्व.आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचे त्यांच्या निवासस्थानी जाऊन पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, ‘आजचा अश्विनी जगताप यांचा बलाढ्य विजय हा लक्ष्मण जगताप यांच्या मतदारसंघातील कार्याची पोचपावती आहे.
आज (०४ मार्च) सकाळी चंद्रकांत पाटील यांनी अश्विनी जगताप यांची भेट घेऊन त्यांच्याशी बातचीत केली. त्यावेळी त्यांच्यासोबत शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपने आणि महाविकास आघाडीने कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक ही प्रतिष्ठेची केली होती, त्यामुळे या निवडणुकीकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागून होते. त्यात चिंचवड मध्ये भाजपला मोठा विजय प्राप्त करण्यात यश आले. त्यात अश्विनी जगताप या विजयी झाल्या.