Google Ad
Uncategorized

द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिवजयंती उत्सहात साजरी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दिंनाक १७ फेब्रुवारी २०२३) : नवी सांगवीप्रतिभा महिला प्रतिष्ठान द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली .यावेळी शाळेतील सर्व विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांचे आगमन,प्रमुख पाहुणे पीटीए सदस्य सौ.वैदही पोरे, सौ. रोहिणी टाक, सौ. वैशाली झांजुर्णे, संचालक मंडळ सदस्य सौ स्वाती पवार व त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी – कुमारी राजनंदिनी अभिजित टाक (SOF आंतरराष्ट्रीय इंग्लिश ओलंपियाड रँक ८वा, कुमार. नचिकेत विनोद पोरे ( स्कॉलरशिप परीक्षा ) या विद्यार्थ्यांनी यश मिळवल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिवजयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनावर आधारित जीवनपट सादर केला. तसेच शिवचरित्र, शिवगीत, नृत्य, पोवाडा, शिवगर्जना, मनोगत इत्यादी विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आले .

Google Ad

शिवस्तूर्ती (आर्वी पवार), मनस्वी जगताप( मनोगत), ऐश्वर्या कदम (शिवगीत), शिवगर्जना (रिवा पवार), स्वरा विबे (मनोगत), श्लोक गिरी (पोवाडा) ,यादव नाट्या (मनोगत), सेजल पवार, साक्षी सोनकाटे (पोवाडा) विविध छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नृत्य सादरीकरण करण्यात आले. शिवाजी महाराजांनी ज्या युद्ध कलांचा उपयोग युद्ध जिंकण्यासाठी गनिमी काव्यासाठी केला होता. त्या कलांचे उदाहरणार्थ लाठीकाठी दांडपट्टा गोफण तलवारबाजी या सर्व युद्ध कलांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ,त्यांचे कार्य, त्यांची दूरदृष्टी या सर्वांची ओळख मुख्याध्यापिका सौ जयश्री माळी यांनी विद्यार्थ्यांना करून दिले.यावेळी संस्थेचे सचिव श्री. शंकर शेठ जगताप यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. संस्था सदस्य सौ.स्वाती पवार, पूर्व प्राथमिक प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सौ. जयश्री माळी, माध्यमिक उच्च माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका सौ. इनायत मुजावर उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्वाती येवले व सौ. शिल्पा ठिगळे यांनी केले. यावेळी सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Ad3
ad2
ad1
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!