Google Ad
Uncategorized

चिंचवडमधून नाना काटे महाविकास आघाडीचे उमेदवार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ फेब्रुवारी) : चिंचवड पोटनिवडणुकीसाठी नाना काटे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत. चिंचडवसह कसबा पेठेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील होते. पण आता दोन्ही ठिकाणी उमेदवार देण्यात आल्याने निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे.

“चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  नाना काटे हे उमेदवार असतील, महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सांगितलं.

Google Ad

चिंचवड पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि नाना काटे आमनेसामने असतील, आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघातील केलेल्या कार्याची साथ अश्विनी जगताप यांना मिळणार असल्याने त्यांना या निवडणुकीत अधिक सामना करावा लागणार नाही असे बोलले जात आहे.

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधान सभा विरोधी पक्ष नेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची त्यांनी मागणी केली आहे.

दुसरीकडे काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, “आम्ही उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत. निवडणूक बिनविरोध करण्याबाबत मला एकनाथ शिंदेंचा फोन आला होता. टिळक कुटुंबाला तिकीट मिळेल असं वाटत होतं पण ते मिळालं नाही.”

“टिळकांच्या घरातील उमेदवाराला तिकीट दिले असते तर बिनविरोधाचा विचार केला असता. मी फडणावीसांशी बोलेन की टिळक परिवारावर अन्याय का केला?” असंही पटोले म्हणाले. चिंचवडमध्ये महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस जागा लढेल, असंही पटोले यांनी सांगितलं.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!