महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ जानेवारी) : दिनांक २६ जानेवारी मृत्युंजय एज्युकेशन सोसायटी प्राथमिक विभाग सांगवी ७४ वा प्रजासत्ताक दिन व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका माजी महापौर मा. सौ. उषाताई उर्फ माई ढोरे लाभल्या होत्या. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नृसिंह गृहरचना सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री सुहास तळेकर व उपाध्यक्ष मा . अॅड. प्रा .श्री. नितीन कदम हे उपस्थित होते .नृसिंह माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री संकपाळ सर व ज्येष्ठ शिक्षक श्री शरद ढोरे सर हे कार्यक्रमास हजर होते. शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ जाधव मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
राष्ट्रगीत ध्वजगीता नंतर विद्यार्थ्यांची सामूहिक कवायत घेण्यात आली.मा. मुख्याध्यापिका सौ जाधव मॅडम यांनी शाळेच्या गुणवत्ता विकासाचे अहवाल वाचन पालकांसमोर केले.पिंपरी चिंचवड महानगरपालिका माजी महापौर मा. सौ.माई ढोरे यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.
कला क्रीडा व शैक्षणिक गुणवत्ता यामध्ये वर्षभर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून त्यांचा उत्साह वाढवण्यात आला. मा. सौ. आदिती निकम व आयसीडब्ल्यू संस्थेच्या कार्यकर्त्या आरती श्रोत्री, सायली देशमुख यांचाही सत्कार शाळेतर्फे करण्यात आला. विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषणे केली. वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थ्यांनी नृत्य नाट्य विविध कला यांचे सादरीकरण केले.सकाळच्या थंडीत सुद्धा मुलांच्या उत्साहामुळे आनंदी वातावरण तयार झाले होते .एकमेकांच्या कलागुणाला विद्यार्थी व सर्व पालक टाळ्या वाजवून दाद देत होते, शाळेचे प्रांगण पालक व सांगवी परिसरातील नागरिकांनी तुडुंब भरलेले होते. तरीही शिस्तीत कोणतीही बाधा न आणता पालकांनी सर्व कार्यक्रम शांतपणे पाहिला व त्याचा आनंद घेतला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सविता लबडे व सौ. अंजली पवार यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले. सौ सुप्रिया मोरे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.