Google Ad
Editor Choice

स्व.आ.लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ वारकरी साधकांना त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने ३३ सायकलींचे वाटप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ जानेवारी) : महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून संतभुमी अलंकापुरी नगरीत वारकरी शिक्षण घेण्यासाठी विविध वारकरी शिक्षण संस्थेत येत असतात त्यांना वारकरी प्रथेप्रमाणे अलंकापुरी पंचक्रोशीत मधूकरी आणन्यासाठी पायी जावे लागत असते, त्यासाठी वारकरी साधकांना मधुकरी साठी चार ते पाच तास लागतात हा वारकरी साधकांचा वेळ वाचावा आणि वारकरी शिक्षणासाठी अधिकाधिक वेळ मिळावा या हेतूने भक्ती शक्ती संघाच्या संकल्पनेतून पिंपरी चिंचवड शहराचे लोकनेते स्व.आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप मित्र परीवाराच्या वतीने सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत षट्तिला एकादशीच्या दिवशी मधुकरीसाठी वारकरी साधकांना सायकल वाटप करण्यात आले.

यावेळी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे बंधू विजय जगताप, स्वामी शिवानंदजी महाराज, वारकरी शिक्षण संस्थेचे सचिव बाजीराव नाना चंदीले, अध्यापक उल्हास महाराज सुर्यवंशी, तुकाराम मुळीक, माजी नगरसेवक सुरेश भोईर, आळंदी भाजप शहराध्यक्ष किरण येळवंडे, सुभाष काटे, उन्नती सोशेल फौंडेशनचे संजय भिसे, माजी नगरसेवक आप्पा बागल, गणेश गावडे, रामदास कसप्टें, उद्धव कवडे, रमेश काशीद, राजू नागणे, गणेश सोनवणे, सुरेश शिंदे, राजाराम महाराज, भक्ती शक्ती संघाचे अध्यक्ष संदिप महाराज लोहर, ओबीसी अध्यक्ष ज्ञानेश्वर बनसोडे, युवा मोर्चाचे अध्यक्ष आकाश जोशी, शहर उपाध्यक्ष विकास पाचुंदे तसेच वारकरी शिक्षण घेणारे साधक बहूसंख्येने उपस्थित होते.

Google Ad

यावेळी मार्गदर्शन करताना वारकरी शिक्षण संस्थेचे सचिव बाजीराव नाना चंदीले यांनी सांगितले की स्व.आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचा आणि वारकरी शिक्षण संस्थेचा ऋणानुबंध होता, त्यांनी वेळोवेळी वारकऱ्यांना सहाकार्य केले आहे. भाऊंच्या समाजकार्याचा वारसा पुढे त्यांचे बंधू विजय जगताप आणि शंकर जगताप हे चालवत आहेत, त्याच अनुषंगाने त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने वारकरी साधकांना सायकल वाटप करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भक्ती शक्ती संघाचे अध्यक्ष हभप संदीप महाराज लोहर यांनी केले तर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!