महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ जानेवारी २०२३) : प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांना 31 ऑक्टोबर रोजी 25 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. लाचलुचपत विभागाने सापळा रचून लोहार आणि त्यांच्या साथीदाराला ताब्यात घेतले.
ग्लोबल टीचर अवार्ड विजेते रणजित डिसले गुरुजी यांच्यावर आरोप केल्यांतर शिक्षणाधिकारी किरण लोहार चर्चेत आले होते.
दरम्यान, या लाचखोर किरण लोहार यांनी शिक्षण खात्यात आजपर्यंत केलेल्या कारभाराचा पर्दाफाश झाला आहे. सेवेत असताना त्यांनी जमवलेल्या धनाचा आकडा सांगितल्यास तुमच्याही भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाही. लोहार यांनी गेल्या 9 वर्षांच्या कार्यकाळात तब्बल 50 कोटींपेक्षा अधिकची संपत्ती जमवल्याची माहिती समोर आली आहे. चुकीच्या मार्गाने ही संपत्ती म मिळवल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर ‘अपसंपदा’ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.