Google Ad
Editor Choice

दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपासून सुरु होणार बोर्डाची परीक्षा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० डिसेंबर) : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे.

राज्यात पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळाकडून दहावी-बारावीची परीक्षा घेतली जाते. मंडळाने याआधी 19 सप्टेंबर 2022 रोजी लेखी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करुन त्यावर 15 दिवसांत सूचना करण्याचे आवाहन केले होते. या सूचनांनुसार दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

Google Ad

येथे पाहा अंतिम वेळापत्रक — http://www.mahahsscboard.in

दहावी-बारावीच्या परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना छापील स्वरूपात अंतिम वेळापत्रक दिले जाणार आहे. मंडळाकडून शाळांना दिल्या जाणाऱ्या छापील वेळापत्रकानुसारच पेपरच्या तारखांची विद्यार्थ्यांनी खात्री करावी, असे आवाहन मंडळाने केले आहे.

प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना कळविले जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले.

सीबीएसई’च्या तारखा जाहीर

दरम्यान, ‘सीबीएसई’ बाेर्डानेही दहावी-बारावीच्या लेखी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान, तर बारावीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिलदरम्यान होणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून http://cbse.gov.in या संकेतस्थळावर हे वेळापत्रक पाहता येणार आहे.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा https://maharashtra14news.com/

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!