Google Ad
Editor Choice

स्मशानात 40 वर्षाहून अधिक काम करणाऱ्या 80 वर्षीय देवाप्पा जमादार यांच्या सेवावृत्तीला आधुनिकतेचे कोंदण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ ऑगस्ट) : जन्म – मृत्यू अटळ सत्य आहे, आप्तस्वकीय, जिवलग जाण्याने मन अगदी सैरभैर होतं. अशा प्रसंगी कोणाचा तरी मदतीचा हात हवा असतो.  एकीकडे आपल्याला त्या दुखःतुन सावरायचे ही असते. अन् दुसरीकडे आपल्या आपतेष्टांना मोक्ष मिळवून देण्यासाठी अंत्यसंस्काराची सर्व तयारीही करायची असते. मात्र यासाठी कोणकोणत्या वस्तू आवश्यक आहेत? त्या कोठे मिळतात? शिवाय पार्थिव एका शहरातून दुसऱ्या शहरात अंत्यसंस्कारासाठी न्यायचे असेल तर काय करायचे? असे अनेक प्रश्न उभे राहतात. अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न  पिंपरी – चिंचवड परिसरात  सेवा वृत्तीने  स्मशानात काम करणाऱ्या देवाप्पा जमादार यांच्या पुढच्या पिढीने केला आहे, तो  mokshprapti.com या पोर्टलच्या माध्यमातून.  या पोर्टलावर  ताटी बांधण्यापासून खांदेकरी, लाकडं, पुरोहित, अस्थि विसर्जन असे सर्व काही एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

आपल्या उपक्रमाबद्दल पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना  खंडेराव जमादार म्हणाले, आम्ही मुळचे सोलापूर (केगाव)  जिल्ह्यातील असून आमचे वडील देवाप्पा जमादार कामाच्या शोधात आधी मुंबई व नंतर 1980 मध्ये चिंचवड येथे स्थायिक झाले. सुरवातीला वॉचमन म्हणून त्यांनी काम केले. तेव्हा घराच्या समोर एक स्मशानभूमी होती. तेव्हा वडील तेथे सेवा भावाने मदत करायला जात असत. कालांतराने लोक त्यांना स्वतःहून बोलवायला लागले. हे काम सेवा वृत्तीने करत  1995 नंतर आम्ही अंत्यसंस्कारांचे सामान विकण्यास सुरूवात केली.  असे असले तरी वडील सेवा वृत्तीने लोकांना मदत करत आजही वयाची 80 वर्षे ओलांडली असली तरी ते त्याच पद्धतीने लोकांच्या मदतीला जातात.

Google Ad

आज पुण्याचा विस्तार वाढला आहे, पुण्या बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे, आता न्यूक्लियर फॅमिली सिस्टिम झाली आहे; आणि नोकरी निमित्त लोक शहरात स्थायिक झाले आहेत. यामुळे जेव्हा एखादी अनपेक्षित मृत्यूची घटना घरात घडते तेव्हा त्या कुटूंबाला काय करायचे हे समजत नाही. अशावेळी तिरडीपासून स्मशानभूमीतील पास पर्यंत आणि अस्थिविसर्जना पासून चौदाव्या दिवसा पर्यंत ज्या अनेक गोष्टी कराव्या लागतात. काहीच्या घरी तर खांदे द्यायलाही व्यक्ती नसतात. याची दखल घेवून आम्ही mokshprapti.com च्या माध्यमातून सर्व सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत.

या वेबसाईटवर तुम्हाला काडीपेटी पासून ब्लेड, नाव्ही, अॅम्ब्युल्यन्स आदी सर्व गोष्टी एका छताखाली मिळणार आहेत. शिवाय दुसऱ्या दिवशी अस्थि विसर्जन, त्यानंतर  दहावा, तेरावा, सर्व प्रकारच्या शांत, आदी विधी आमच्या तर्फे आम्ही करून देतो. याशिवाय पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी लागणारीही सर्व मदत आम्ही करतो. बदलत्या गतिमान जगात आपल्या आपतेष्टांना शेवटचा निरोप देताना अंत्यविधीसाठी अडचण येऊ नये हा आमचा http://mokshprapti.com/ हे पोर्टल सुरू करण्यामागे असल्याचेही जमादार यांनी सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!