Google Ad
Editor Choice

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ! बेसिक सॅलरी ‘ या ‘ फॉर्म्युलावर वाढवणार सरकार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६मे) : केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वेतन आयोगामुळे कर्मचार्‍यांच्या पगारात वाढ होणार नसून, लवकरच नवा फॉर्म्युला ठरणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

जराएचे म्हणणे आहे की, आता सॅलरीसाठी पुढील वेतन आयोग व्हावा, याची तशी शक्यता कमीच आहे, मात्र कर्मचार्‍यांच्या पगारासाठी फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) फॉर्म्युल्याचा विचार होत आहे.

Google Ad

कधी लागू होणार नवीन फार्म्युला ?
सरकारने अद्याप याची अधिकृत घोषणा केलेली नसली तरी सरकार 2024 नंतर हा नवीन फॉर्म्युला लागू करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनुसार, दरवर्षी केंद्रीय कर्मचार्‍यांचे पगार नव्या फॉम्युलानुसार ठरवले जातील. या आधारावर वार्षिक पगार वाढवणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.

काय आहे नवीन फॉर्म्युला, जो चर्चेत आहे
कर्मचार्‍यांचे पगार वाढवण्यासाठी सरकार Aykroyd फॉर्म्युलावर चर्चा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सरकारी कर्मचार्‍यांचे किमान मूळ वेतन फिटमेंट फॅक्टरच्या आधारे ठरवले जाते.

यावर वर्षात दोन वेळा जानेवारी आणि जुलैमध्ये महागाई भत्त्यात सुधारणा केली जाते. आता नवा फॉर्म्युला ठरवला तर पगार महागाई चा दर, राहणीमानाचा खर्च आणि कर्मचार्‍यांच्या कामगिरीशी जोडला जाईल.

7th Pay Commission च्या शिफारशीच्या वेळी, न्यायमूर्ती माथूर यांनी सूचित केले होते की पे – स्ट्रक्चर नवीन फॉर्म्युलाकडे (Aykroyd Formula) न्यायचे आहे.

यामध्ये कर्मचार्‍यांचा दैनंदिन खर्च लक्षात घेऊन वेतन निश्चित केले जाते. Aykroyd फॉर्म्युला लेखक वॉलेस रुडेल आयक्रोयड यांनी दिला होता.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!