Categories: Editor Choice

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ६९ मोटार ड्रायव्हिंग स्कूल अनधिकृतपणे सुरू; आमदार लक्ष्मण जगताप यांनी अधिवेशनात केला प्रश्न, मुख्यमंत्र्यांनी दिले लेखी उत्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ ऑगस्ट) : -चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक मोटार ड्रायव्हिंग स्कूल अनधिकृतपणे सुरू असल्याच्या मुद्द्याकडे आमदार लक्ष्मण जगताप यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करून विधानसभेचे लक्ष वेधले आहे. दोन्ही शहरात किती मोटार ड्रायव्हिंग स्कूल मुदत संपल्यानंतरही सुरू आहेत?, अशा संस्थांवर शासनाने काय कार्यवाही केली?, असे प्रश्न आमदार जगताप यांनी अधिवेशनात उपस्थित केले. त्यांच्या प्रश्नांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तर दिले असून, पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरात ६९ मोटार ड्रायव्हिंग स्कूल मुदत संपल्यानंतरही नूतनीकरण न करता सुरू आहेत. तसेच २१६ मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे परवाने रद्द करण्याची कारवाई सुरू असल्याचे उत्तरात म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरात अनेक मोटार ड्रायव्हिंग स्कूल आहेत. परंतु, यातील अनेक मोटार ड्रायव्हिंग स्कूल अनधिकृतपणे सुरू आहेत. आरटीओकडून घेतलेल्या परवान्याचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. तसेच आरटीओने देखील या मोटार ड्रायव्हिंग स्कूलची तपासणी केलेली नाही. याप्रकरणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले. आमदार जगताप यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे, “पुणे कार्यालयाच्या अभिलेखावर मंजूर मोटार ड्रायव्हिंग स्कूलची एकूण संख्या ५०३ आहे. यांपैकी २८७ मोटार ड्रायव्हिंग स्कूलना सारथी ४.० प्रणालीवर लॉगीन आयडी देण्यात आले आहेत. परंतु, २८७ पैकी २१८ मोटार ड्रायव्हिंग स्कूलचा परवाना वैध आहे. उर्वरित ६९ मोटार ड्रायव्हिंग स्कूलची मुदत संपलेली आहे. त्यांनी अद्याप नूतनीकरण केलेले नाही. नूतनीकरणासाठी या सर्व मोटार ड्रायव्हिंग स्कूलना नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यांचे लॉगीन बंद आहेत. उर्वरित २१६ मोटार ड्रायव्हिंग स्कूल बऱ्याच कालावधीपासून बंद असून, त्यांना सारथी प्रणालीवर लॉगीन दिलेले नाहीत. त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई सुरू आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत (आरटीओ) नवीन मोटार ड्रायव्हिंग स्कूल मंजूर करताना अथवा मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या नूतनीकरणास मंजुरी देताना संबंधित कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून मोटार स्कूलची प्रत्यक्ष पाहणी करून मोटार वाहन कायद्यातील तरतुदी विचारात घेऊन परवाना मंजुरी अथवा त्याचे नूतनीकरण केले जाते. प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सर्व मोटार ड्रायव्हिंग ‌स्कूलची तपासणी करण्यासाठी विशेष मोहिम राबवण्यात येते.

Maharashtra14 News

Recent Posts

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

4 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

22 hours ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

1 week ago