Google Ad
Editor Choice

पंतप्रधान आवास योजनेसाठी पुणे जिल्ह्याला 61 कोटींचा निधी, जिल्ह्यातून 6,113 लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ ऑगस्ट) : केंद्र सरकारकडून राज्याला पंतप्रधान घरकुल आवास योजनेसाठी (PM Housing Scheme Rural ) 111 कोटी 89 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी 61 कोटी 11 लाख रुपये हे पुणे जिल्ह्यासाठी असणार आहेत. जिह्यात सर्वाधिक निधी भोर (Bhor) तालुक्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. भोरला 18 कोटी 75 लाख, वेल्हे  (Velhe) 16 कोटी 29 लाख, मावळ (Maval) 10 कोटी 43 लाख, रुपये मंजूर करण्यात आले आहेत. (61 crore sanctioned to Pune district for PM housing scheme Rural)

817 गावं पीएमआरडीएमध्ये समाविष्ठ

Google Ad

पीएमआरडीएमध्ये (PMRDA) पुणे जिल्ह्याच्या वर्तुळाकार समाविष्ठ होणाऱ्या वेगवेगळ्या तालुक्यांतल्या गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पुणे शहरासह मावळ तालुक्यांतल्या 189, मुळशी 144, आणि हवेली तालुक्यातल्या सर्व 108, गावांचा समावेश करण्यात आला आहे. यासोबतच खेड 114, शिरूर 68, भोर 53, वेल्हा 52, दौंड 51 आणि पुरंदर तालुक्यातली 38 अशी एकूण 817 गावं पीएमआरडीएमध्ये समाविष्ठ करण्यात आली आहेत.

भोर, वेल्हे, मुळशीतून 6828 लाभार्थ्यंचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैती 6113 लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. राज्य सरकारने त्यांच्या हिश्शाच्या पहिल्या आणि अंतिम टप्प्याचे प्रत्येकी 1 लाख रुपये निधी लाभार्थ्यांसाठी मंजूर केला आहे.

काय आहे पंतप्रधान आवास योजना?

पंतप्रधान आवास योजना (PM housing scheme Rural) ही 15 जून 2015 ला सुरू करण्यात आली. या योजनेत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार झोपडपट्टीवासीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील व्यक्ती, अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती पात्र ठरवता येणार आहेत. योजनेतअंतर्गत घरासाठी ३०० चौरसफुटांचे बांधकाम करता येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारचे दीड लाख तर राज्य सरकारचे 1 लाख असे एकूण अडीच लाख रुपये अनुदान मिळते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!