रिलायन्सकडून 5G स्मार्टफोन, त्यावर सर्व फ्री…फोनची किंमतही फ्री सारखीच…याच महिन्यात करणार घोषणा?

महाराष्ट्र 14 न्यूज : रिलायन्स जिओने आपल्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची तारीख जाहीर केली आहे. यंदा Reliance AGM 2021 चे आयोजन 24 जून रोजी दुपारी 2 वाजता केले जाणार आहे. जे यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित (LIVE) केले जाईल. या AGM मध्ये, कंपनी कमी किंमतीच्या 5G स्मार्टफोन, जिओ 5 जीच्या लाँचिंगसह आणखी बऱ्याच घोषणा करू शकते.

मागील वर्षी कंपनीने गूगलसोबत जिओ 5G फोन बाजारात आणण्याची घोषणा केली होती आणि यावर्षी अशी अपेक्षा आहे की, याला AGM मध्ये लाँन्च केले जाईल. हा 5G फोन अँड्रॉइडच्या फोर्कड व्हर्जनवर काम करेल आणि देशातील स्वस्त स्मार्टफोनपैकी एक असेल. दुसरीकडे, जर अहवालांवर विश्वास ठेवला तर Jio 5G फोनची किंमत 2 हजार 500 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जर सध्याच्या भारतातील सर्वात स्वस्त 5G फोनबद्दल बोलायचे झाले, तर त्याची किंमत 13 हजार 999 रुपये आहे आणि जिओ आता फक्त 2 हजार 500 रुपयांमध्ये 5G फोन आणण्याचा विचार करत आहे. जेणेकरून ते अधिकाधिक लोकांपर्यंत आणि 2 जी नेटवर्क यूझर्सपर्यंत पोहोचू शकेल.

मुकेश अंबानी यांनी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये सांगितले होते की, जिओ 5G  सेवा 2021 च्या मध्यात सुरू केली जाऊ शकते. त्यामुळे आता अशी अपेक्षा आहे की, Reliance AGM 2021 मध्ये याची घोषणा केली जाईल.

कंपनीला 5G चाचणीमध्ये यापूर्वीच 1 Gbps वेग मिळाला आहे. कंपनीने म्हटले आहे की, त्यांनी पूर्ण 5G सोल्यूशन तयार केले आहे आणि त्यामध्ये 100% स्वदेशी तंत्रज्ञान आणि सोल्यूशन वापरले जाईल.

Jio 5G फोन आणि Jio 5G सेवेसह, कंपनी ग्राहकांना स्वस्त दरातील JioBook लॅपटॉप देखील उपलब्ध करुन देऊ शकतात. त्यातील काही स्पेसिफिकेशन्स यापूर्वीच लोकांसमोर आले आहे. असे म्हटले जात आहे की, हा लॅपटॉप कस्टम अँड्रॉइड व्हर्जनवर काम करेल आणि Qualcomm Snapdragon 665 चिपसेटद्वारे चालवला जाईल.

यात 1366 × 768 रेझोल्यूशनसह डिस्प्ले दिला जाऊ शकतो आणि यासह 2GB RAM आणि 32GB इंटरनल स्टोरेज मिळू शकेल. यासह 4GB RAM आणि 64GB  स्टोरेज असलेले व्हेरिएंटसुद्धा दिले जाऊ शकतात.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

23 hours ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

1 day ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

2 days ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

2 days ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

2 days ago