Google Ad
Editor Choice Sports

52 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! लाल मातीमध्ये जोकोव्हिचनं एकट्यानं ग्रँडस्लॅम दुसऱ्यांदा आपल्या नावावर करण्याचा विक्रम केला.

महाराष्ट्र 14 न्यूज : फ्रेंच ओपन स्पर्धेतील अंतिम सामन्याचा निकाल नुकताच लागला आहे. युवा आणि झुंजार त्सित्सिपासला पराभूत करत  नोव्हाक जोकोव्हिचनं इतिहार रचला आहे. राफेल नदालला सेमिफायनलमध्ये पराभूत करून फायनलमध्ये देखील जोकोव्हिचनंच बाजी मारली आहे. फ्रेंच ओपन स्पर्धेचं विजेतेपद नोव्हाक जोकोव्हिचनं पटकावलं आणि १९वं ग्रँडस्लॅम पदावर आपलं नाव कोरलं.

ग्रीसचा २२ वर्षांचा युवा टेनिसपटू स्टेफानोस त्सित्सिपास आणि जगातील प्रथम क्रमांकाचा सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचमध्ये चुरशीची लढत झाली.  हा अंतिम सामना अंगावर रोमांच उभा करणार होता. पाच सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात जोकोव्हिचने त्सित्सिपासला 6-7, 2-6, 6-3, 6-2, 6-4 हरवत फ्रेंच ओपनचं दुसऱ्यांदा जेतेपद पटकावलं.

Google Ad

52 वर्षांत पहिल्यांदाच जोकोविचने सिंगल ग्रँडस्लॅम मिळवणारा खेळाडू ठरला आहे. लाल मातीवर आपली सत्ता गाजवत त्याने हा विक्रम रचला. सुरुवातीचे दोन सेट गमवल्यानंतर सामना हातातून निसटू नये यासाठी त्याने उर्वरित सेटमध्ये प्राण पणाला लावून प्रयत्न केले आणि त्याला अखेर यश मिळालं. एकट्यानं हा ग्रँडस्लॅम जिंकण्याची त्याची दुसरी वेळ आहे. त्याचं जगभरात कौतुक होत आहे.

 

तिसऱ्या सेटनंतर त्सित्सिपासला पाठीचं दुखणं सुरू झालं. मात्र त्याने मैदान सोडलं नाही. या युवा खेळाडूनं जिंकण्याची आशा अखेरपर्यंत सोडली नाही. तो प्रयत्न करत राहिला. चौथ्या सेटपासून जोकोविच त्याच्यावर भारी पडला. पहिल्या दोन सेटमध्ये विजय मिळवता आला मात्र शेवटपर्यंत हा विजय टिकवण्यात त्याला यश मिळालं नाही. मात्र या युवा खेळाडूचंही कौतुक होत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

61 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!