Google Ad
Editor Choice Pune

Pune Unlock : लग्न समारंभाला 50 , तर अंत्यसंस्कारांसाठी 20 जणांना परवानगी … वाचा संपूर्ण नियमावली

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४जून) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्यामुळे पुणे जिल्ह्यातील निर्बंध सोमवारपासून उठवण्यात येणार आहेत. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार पुण्यातील मॉल, अभ्यासिका, ग्रंथालय 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. तर लग्न सभारंभासाठी 50 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, लग्न समारंभाला 50, तर अंत्यसंस्कारांच्या कार्यक्रमांमध्ये केवळ 20 जणांना परवानगी देण्यात आली आहे.

पुण्याच्या शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने त्याठिकाणी सरसकट दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. या दुकानांसाठी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतची वेळ ठरवून देण्यात आली आहे. तर पुण्यातील पीएमपी बससेवाही आजपासून 100 टक्के क्षमतेने सुरु होणार आहे. सार्वजनिक बस वाहतूक सुरु झाल्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Google Ad

सोमवारपासून पुण्यात काय सुरु?

दुकानं सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहतील.

बसमध्ये 100 टक्‍के आसन क्षमतेने प्रवास, मात्र उभे राहून प्रवास करण्यास मनाई

मॉल, अभ्यासिका, ग्रंथालये 50 टक्के क्षमतेने सुरू

हॉटेल रात्री 10 वाजेपर्यंत टक्के क्षमतेने सुरू

हॉटेलमधील पार्सल सेवा रात्री 11 पर्यंत सुरू राहणार

सार्वजनिक मैदाने पहाटे 5 ते सकाळी 9 आणि दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुली राहणार.

लग्न सभारंभ कार्यक्रम हे हॉलच्या आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने किंवा 50 व्यक्तींच्या उपस्थितीत करण्याची परवानगी राहिल.

अंत्यसंस्कार, दशक्रिया आणि संबंधित कार्यक्रम जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थितत करण्यास परवानगी

सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम आणि मनोरंजन कार्यक्रमास 50 लोकांच्या उपस्थितीत संध्याकाळी 7 पर्यंत परवानगी

विविध बैठका, सभा, स्थानिक संस्था तसेच सहकारी संस्थांच्या मुख्य सभा 50 टक्के उपस्थितीत घेण्यास परवानगी राहिल

जिम, सलून, स्पा 50 टक्‍के क्षमतेने सुरू करता येणार

शहरात 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी

रात्री 10 नंतर संचारबंदी

मद्यविक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सुरू राहणार

रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट हे रात्री 11 पर्यंत 50 टक्के आसन क्षमतेने सुरु राहतील. पार्सल सेवा/ घरपोच सेवा रात्री 11.00 पर्यंत सुरु राहील

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!