शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ४८० कोविड मार्शल ठोठावणार दंड … अशी होणार कारवाई!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७जून) : पिंपरी-चिंचवड शहरात सद्यस्थितीत लॅाकडॅाउनचे नियम शिथील करण्यात आलेले आहेत. त्यामुळे रस्त्यांवरती वर्दळ वाढलेली दिसते. त्यामुळे मास्क वापरणे अपरिहार्य आहे. परंतु काही जण अद्याप सदर नियमांचे उल्लंघन करताना दिसून येतात. त्यावर चाप बसविणेकरिता कोविड प्रतिबंधात्मक उपायांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, नागरिकांना जबाबदारीची जाणीव करून देण्याबरोबरच, बेजबाबदार विनामास्क वावरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी 480 कोविड मार्शलांची नेमणूक करण्यात आली आहे.

शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना समज देऊन ,त्यांच्याकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. तसेच त्यांना मनपामार्फत मास्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे निर्धारित केलेल्या वेळेव्यतिरिक्त दुकाने चालू ठेवल्यास, दुकानदारांवरही कारवाई करण्यात येणार आहे. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तीन कर्मचाऱ्यांचे एक पथक, याप्रमाणे संपूर्ण शहरात 160 पथके तयार करण्यात आली आहेत .

शहरातील बाजारपेठा, मंडई, गर्दीची ठिकाणे,रहदारीचे रस्ते, इ. ठिकाणी सदर पथके लक्ष ठेवणार आहेत. विनामास्क आढळलेल्या नागरिकांवर कारवाई करून, त्यांना महापालिकेकडून एक मोफत मास्कही देण्यात येणार आहे. तसेच वसूल केलेल्या दंडातून दहा टक्के रक्कम, ही सदर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून मिळणार आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी वीस पथकांची नेमणूक करण्यात आली आहे .या पथकांची विभागणी करून, सकाळी सात ते रात्री अकरा या वेळात ती कार्यरत राहतील. असे नियोजन करण्यात आले आहे. यासंबंधीचे आदेश मा.आयुक्त श्री. राजेश पाटील यांनी दिल्या आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

9 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

16 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

1 day ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago