Categories: Editor Choice

मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्षअरुण पवार यांची … वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून विविध संस्थांना आर्थिक मदत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ऑगस्ट) : पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष व वृक्षमित्र अरुण पवार यांचा वाढदिवस अवास्तव खर्च टाळून विविध संस्थांना आर्थिक मदत करीत साधेपणाने साजरा करण्यात आला.

यामध्ये आळंदी येथील ३२विधवा महिला व अंध अपंगांसाठी पेंशन फॉर्म मोफत भरून तहसीदार कार्यालयात जमा केले. सामाजिक कार्यकर्ते विजय वडमारे व राजन गायकवाड यांनी यासाठी सहकार्य केले. याबरोबरच चारशेहून अधिक निराधार महिला व पुरुषांची नोंदणी करून फॉर्म भरून घेतले.

याबरोबरच वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून श्री भैरवनाथ जोगेश्वरी अन्नछत्र मंडळ ट्रस्ट या संस्थेला स्वतःची जागा घेण्यासाठी एकवीस हजार रुपयांची आर्थिक मदत धनादेश स्वरूपात करण्यात आली. यावेळी बालाजी पवार ट्रस्टचे अध्यक्ष महेश कारकर, अशिष पवार कोषाध्यक्ष रवींद्र खुळे, गणेश पवार सदस्य भीमा घाडगे, अभिषेक पवार सागर वायकर मोना पवार यांनी हा धनादेश स्वीकारला.

तर जीवनविद्या परिवर्तन ट्रस्ट, पुणे संचलित स्नेहछाया सामाजिक प्रकल्पाच्या स्नेहछाया निवारा मदत कार्यात सहभागी होत एकवीस हजार रुपयांचा धनादेश जीवनविद्या परिवर्तन ट्रस्टकडे प्रदान करण्यात आला. हा धनादेश ट्रस्टचे दत्तात्रय इंगळे, अनिल पाटील, सोनू पवार अमोल लोंढे,विशाल पवार सहदेव मोरे जयसिंग पाटील यांनी स्वीकारला.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

2 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

2 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

3 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

6 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago