Google Ad
Editor Choice

40% पाण्याची गळती कडे आयुक्त साहेब लक्ष द्या : पिंपरी चिंचवड शिवसेनेची मागणी…..

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ सप्टेंबर) : चिंचवड शहराला मागील दोन वर्षापासून पाणीपुरवठा व प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.सध्या समाधानकारक पाऊस झाला असताना व 100% पवना धरण भरलेले असताना सुद्धा प्रशासनाकडून दिवसाआड पाणीपुरवठा का केला जात आहे.? पवना धरणातून दररोज 500 एम एल डी पाणी उचलले जात असून शहरवासीयांपर्यंत पाणी पोहोचेपर्यंत त्यातील 40% पाण्याची गळती झालेली असते

शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा या दृष्टिकोनातून महापालिकेकडून स्काडा प्रकल्प राबविण्यात आला पाणीचोरी वर आळा बसविण्यासाठी कोट्यावधी खर्च करत सर्व सोसायट्यांमधे पाणीमीटर बसविण्यात आले 24×7 पाणी हि योजना करीत कोट्यावधी रूपये खर्च केले नवीन पाईप लाईन टाकल्या परंतू पाणीपुरवठा विभाग व प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे सर्व योजना फसल्या व नागरिकांना हक्काच्या पाण्यापासून मुकावे लागले टँकर लाॅबी आजही कार्यरत असून काही अधिकार्यांना त्यांचा पाठींबा आहे.

Google Ad

नागरिकांचे हक्काचे पाणी पळविले जात आहे. महापालिकेच्या वतीने विविध योजना व नवनवीन प्रकल्प राबविण्यात आले परंतु पाणीपुरवठा व प्रशासनाच्या चुकीची व ढिसाळ कारभारामुळे अजूनही शहरवासीयांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो तरी आयुक्त साहेब आपली नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर आपल्याकडून बर्‍याच अपेक्षा आहेत त्यातच आपल्या कामाची प्रचिती आम्ही जानून आहोतच तरी सदर प्रकरणी जातीने लक्ष घालून गोरगरीब सामान्य नागरिकांना हक्काचे पाणी मिळवून द्याल व दररोज पाणीपुरवठा करताल यात साशंकता नाही त्याचबरोबर 40% टक्के होनारी पाणी गळती थांबवावी त्याबाबत माहिती घेत प्रशासनाकडून जाणून बूजून पाणी गळती केली जाते याचा तपास लावावा तसेच पाणी गळती होते कि केली जाते याचा शोध घेऊन नक्की पाणी कोठे मुरते याचा शोध घ्यावा व संबंधितावर कारवाई करण्यात यावी असे निवेदन पिंपरी चिंचवड शिवसेनेकडून आयुक्तांना देण्यात आले.

यावेळी बाळासाहेब वाल्हेकर जिल्हाप्रमुख राजेश वाबळे पिंपरी विधानसभा प्रमुख सौ सरिताताई साने पिंपरी महिला संघटिका  निलेश हाके युवासेना अधिकारी पिंपरी, निखिल येवले, बशीर सुतार, रवींद्र ब्रम्हे, निलेश तरस राजेंद्र अडसूळ प्रशांत कडलक उमेश रजपूत नरेश टेकाडे श्री माऊली जगताप युवासेना प्रमुख चिंचवड अंकुश कोळेकर, प्रदिप दळवी, सुनील पाटील विभागप्रमुख तुषार दहीते शाखा प्रमुख मलिक मुजावर श्री शुभम भदाणे, रुपेश हिरे सौ. शैला पाचपुते सौ. शैला निकम उपस्थित होते

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!