Categories: Uncategorized

तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथील पूल दुर्घटनेत 4 मृत्यू तर 51 जखमी..!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी नदी वरील लोखंडी पूल कोसळल्याची दुर्घटना रविवार, दुपारी 3:30 च्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू तर 51 जखमी झाले आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे

सदर लोखंडी पूल हा आजुबाजूच्या दोन गावांना जोडणारा लोखंडी पूल असून सदर लोखंडी पूल हा सुमारे 30 वर्ष जुना आहे. सदर कुंडमळा या ठिकाणी अंदाजे 100 ते 125 पर्यटक वर्षाविहारासाठी आले असता लोखंडी पुल कोसळून त्या खाली काही पर्यटक अडकले असल्याचे समजताच सदर ठिकाणी बचावकार्यासाठी स्थानिक प्रशासन, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) चे 2 पथक, पिंपरी चिंचवड आयुक्तालय पोलिस यंत्रणा, केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF), आपदा मित्र, पुणे / पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (PMRDA) चे अग्निशमन दल, शिवदुर्ग संघटना, वन्यजीव संघटना यांचे मार्फत शोधकार्य सुरु केले होते.

कुंडमळा येथील घडलेल्या दुर्घटनेमध्ये एकूण 51 व्यक्ती जखमी झाले असून जखमी व्यक्तीनां रुग्णवाहिकेच्या मदतीने सोमाटणे फाटा, ता. मावळ येथील 1) पवना रुग्णालय, 2) मायमर हॉस्पिटल, 3) अथर्व हॉस्पिटल आणि 4) युनिक हॉस्पिटल मध्ये उपचाराकरीता दाखल केले आहे. सदर घटनेत एकूण 04 व्यक्तींचा मृत्यू झाला असून पुढील कार्यवाही सुरु आहे.

इंद्रायणी नदीपात्रात कोसळलेला लोखंडी पूल क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. तसेच सदर घटनास्थळी मा. मंत्री आपत्ती व्यवस्थापन, मा. मंत्री मदत व पुनर्वसन, मा. विभागीय आयुक्त – पुणे विभाग, मा. खासदार – बारामती लोकसभा, मा. आमदार मावळ विधानसभा, जिल्हाधिकारी पुणे, उपविभागीय अधिकारी-मावळ, तहसिलदार मावळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक तळेगाव दाभाडे हे उपस्थित होते.

या घटनेच्या अनुषंगाने अधिक माहिती आवश्यक असल्यास नियंत्रण कक्षाच्या पुढील क्रमांकावर टोल फ्री : 1077 किंवा नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र.: 020 26123371, 26133522, 26133523 विठ्ठल बनोटे (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी): 8975232955, राहुल पोखरकर (आपत्ती व्यवस्थापन कक्ष सहाय्यक): 8888565317 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, गृहनिर्माण संस्था यांना गणपती उत्सवासाठी दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या परवानग्या ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी दि.१९ ऑगस्ट २०२५:- पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय…

2 days ago

देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्वपूर्ण निर्णय! जाणून घ्या…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.19 ऑगस्ट -- देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज चार…

2 days ago

मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा …. खडकवासला, पानशेत, वरसगाव व पवना धरणातून विसर्ग

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १८/०८/२०२५ व १९/०८/२०२५ रोजी सकाळी पावसाचे प्रमाण व खडकवासला पानशेत, वरसगाव…

2 days ago