Google Ad
Uncategorized

-पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी भाजपा सज्ज; शेकडो इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर (प्रतिनिधी) :  पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी केली असून त्याचाच एक भाग म्हणजे शहरातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात नुकत्याच पार पडल्या. इच्छुक उमेदवारांकडून आलेल्या विक्रमी प्रतिसादामुळे भाजपची शहरातील ताकद आणि जनतेचा विश्वास स्पष्टपणे दिसून आला असल्याचे पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.

पिंपरी मोरवाडी येथील भाजपा पक्ष कार्यालयामध्ये शहरातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती 16 आणि 17 डिसेंबर रोजी संपन्न झाल्या.  तब्बल 730 अर्ज इच्छुक उमेदवाराकडून पक्षाकडे सादर करण्यात आले होते.  या सर्व इच्छुक उमेदवारांची मुलाखत पक्षाचे निवडणूक प्रमुख शंकर जगताप,  आमदार महेश लांडगे,  शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, विधानपरिषद आमदार अमित गोरखे आणि उमा खापरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आले. महापालिका निवडणुकीसाठी तब्बल सातशेहून अधिक  उमेदवारांनी उमेदवारीची मागणी केल्यामुळे भाजपमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Google Ad

या मुलाखत प्रक्रियेबाबत सांगताना निवडणूक प्रमुख शंकर जगताप म्हणाले मुलाखती दरम्यान प्रत्येक इच्छुक उमेदवाराची वैयक्तिक ओळख , संबंधित प्रभागातील सद्यस्थिती, सामाजिक काम, संघटनात्मक अनुभव आणि राजकीय वाटचाल यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पक्षाने नेहमीच पारदर्शक प्रक्रिया आणि सक्षम नेतृत्वाला प्राधान्य दिले आहे. याबाबतचे स्पष्ट निकषच पक्षाने ठरवलेले आहेत आणि याच निकषांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

पिंपरी चिंचवड शहर गेल्या दहा वर्षात विकासाच्या वेगाने धावत आहे. औद्योगिक शहर ते मेट्रोसिटी ही शहराची विकासाची घोडदौड कायम ठेवण्यासाठी दिल्ली ते गल्ली एक पक्ष काम करत असल्यास वेगाने प्रगती होईल हे गेल्या दहा वर्षात आपण पाहिले आहे. त्यामुळे ”भाजपच्या माध्यमातून शहराची प्रगती” हेच गणित उमेदवार आणि मतदारांनी ठरवले आहे असा विश्वास देखील शंकर जगताप यांनी व्यक्त केला आहे. मुलाखती दरम्यान शहरातील अनेक नामवंत व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता आणि मुलाखतीसाठी उपस्थिती लावली होती. त्यामुळे संपूर्ण शहरातील वातावरण हे भाजपच्या बाजूने आहे. यातून उत्साह चैतन्य आणि सकारात्मकतेची लाट जाणवत आहे असे देखील शंकर जगताप यावेळी म्हणाले

………….

या संपूर्ण मुलाखत प्रक्रियेचा सविस्तर अहवाल लवकरच प्रदेश कार्यालयाकडे सादर केला जाणार आहे.  त्यानंतर उमेदवारी वाटपाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष श्री रविंद्र चव्हाण यांच्या सक्षम नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजपचे संघटन कार्य वेगाने सुरू आहे.  प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्ता आणि इच्छुक उमेदवाराच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा आहे. या मुलाखतीमधून इच्छुक उमेदवारांचे सखोल मूल्यांकन आणि सर्वेक्षण केले जाईल.  त्यानंतरच पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाला गती देणाऱ्या उमेदवारांबाबत अंतिम  निर्णय घेतला जाणार आहे.

शंकर जगताप

आमदार चिंचवड विधानसभा तथा
निवडणूक प्रमुख भाजपा पिं.चिं.शहर
Ad3
ad2
ad1
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!