Teens Category मध्ये भोसरीच्या शर्वरी कांबळेने जिंकला ‘श्रावण सुंदरी 2025’चा किताब
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.21 ऑगस्ट :- पिंपरी चिंचवड शहरात पारंपरिक जल्लोष आणि उत्साहाच्या वातावरणात “श्रावण सुंदरी 2025” हा भव्य सोहळा आज (17 ऑगस्ट) चिंचवड येथील एल्प्रो मॉलमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. पिंपरी चिंचवड शहरातील फॅशन इंडस्ट्रीतील मोठं नाव आयोजक सौ. सई तापकीर यांच्या उत्तम नियोजनात व फॅशन ग्रूमर योगेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला. यात Teens Category मध्ये भोसरीच्या शर्वरी कांबळेने ‘श्रावण सुंदरी 2025’चा किताब पटकवला.

यावेळी झालेल्या स्पर्धेतील विजेत्यांची यादी
Category Winner Name
Kids सानिका सावळे
Teens शर्वरी कांबळे
Miss जिया देव्हारे
Mrs सौ. सरिता बेगुडे
Mr ओम काळे
✨ या स्पर्धेचे परीक्षण Mrs. जाहिरा शेख, मंगेश सर आणि विकी शिंदे यांनी केले. कसून परीक्षणानंतर योग्य विजेते ठरवण्यात आले. फॅशन शो, मंगळागौर खेळ, मेकअप स्पर्धा यांसारख्या उपक्रमांमुळे कार्यक्रम रंगतदार झाला. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे आणि सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. यावेळी आधार फॉउंडेशन चिफ आणि भा.ज.पा चे सेक्रेटरी महाराष्ट्र स्टेट प्रेसिडेन्ट श्री.धनराज गवळी हेही उपस्थित होते.
“हा सोहळा म्हणजे परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम आहे. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळेच कार्यक्रम अविस्मरणीय ठरला” असे आयोजिका सौ. सई तापकीर यांनी सांगितले.


