महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक १ जून २०२३:– महापालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे, सौंदर्यीकरण करणे व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत अनुषंगिक कामे करण्यास मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे इतर आवश्यक विविध कामांसाठी येणाऱ्या खर्चासही प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या महापालिका स्थायी समिती सभेत आज मान्यता देण्यात आली.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये संपन्न झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
मनपा दवाखाना, रूग्णालयाकरिता आवश्यक उपकरणे खरेदीस मान्यता देण्यात आली. तसेच पवना नदीच्या शिवणे ते दापोडी या ४४ कि.मी लांबीतील नदीचे सर्व्हेक्षण व सुधारीत पुररेषा आखणी करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
महानगरपालिकेच्या “अ” प्रभागातील जलनि:सारण नलिकांची वार्षिक ठेकेदारी पद्धतीने साफसफाई करणे व गाळ काढणेकमी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक केलेल्या मानधनावरील रुग्णवाहिका वाहनचालक पदांना सुधारित किमान वेतनप्रमाणे मानधनात वाढ करण्यास मान्यता देण्यात आली.
मनपाचे ग क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक २३, २४ व २७ मधील सार्वजनिक शौचालयांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करणेकामी येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.
मनपा प्रभाग क्रमांक १२ मधील रुपीनगर व परिसरातील रस्त्यांची आकस्मित देखभाल दुरुस्ती करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे रुग्णालयीन कामकाजासाठी आहार तज्ञ मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट व मॅनेजर आऊट सोर्सिंग द्वारे अनुबंधित एजन्सी मार्फत नेमणूक करण्यात मान्यता देण्यात आली.
अंकुशराव लांडगे नाट्यगृह, आचार्य अत्रे रंगमंदीर, नटसम्राट निळू फुले रंगमंदीर यांच्या भाड्यात वाढ करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच निगडी येथील ग.दि.माडगुळकर नाट्यगृह भाडे तत्वावर देणेकामी दरास मान्यता देण्यात आली.
पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य रस्ते महामार्ग व १८ मी पेक्षा मोठ्या रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करणे कामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. मनपाचे प्रभाग क्रमांक १५ मधील मनपा इमारतींचे दुरुस्तीची कामे करण्याकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच प्रभाग क्र. १५ मधील ज्ञान प्रबोधनी शाळा परिसर दुर्गेश्वर, मंदिर परिसर व इतर भागांमध्ये डांबरीकरणाची कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
मनपा प्रभाग क्रमांक १९ बी ब्लॉक भाटनगर व इतर परिसरामध्ये पावसाचे पाणी व्यवस्था, दुभाजक, पेव्हिंग ब्लॉक व इतर अनुषंगिक कामे करणेकामी येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली. मनपाचे प्रभाग क्रमांक १४ मध्ये स्थापत्य विषयक कामे करण्याकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
अशुद्ध जलउपसा केंद्र रावेत येथील विविध आवश्यक कामांसाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. महानगपालिकेच्या आरोग्य विभागाकडील आवश्यक रिक्त पदे एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात भरण्यास मान्यता देण्यात आली. महापालिका कार्यक्षेत्रातून वाहणाऱ्या पवना नदी पात्रातील टाटा ब्रिज ते बोपखेल या क्षेत्रातील जलपर्णी काढणे कामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जानेवारी) : २१ जानेवारी २०२५ रोजी जिल्हा रुग्णालय औंध पुणे यांनी…
व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन - *पहिल्या दिवशी महापालिका अधिकारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.19 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री अश्विनी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…