Google Ad
Uncategorized

पालिकेने काढलेल्या जाहिरातीकडे डॉक्टरांनी फिरवली पाठ, काय आहे कारण?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ एप्रिल) :  संपूर्ण महाराष्ट्रात काय देशात कुठलीही भरती निघाली तर तिला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असतो. त्याचे कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. सरासरी एका जागेसाठी कमीत कमी पन्नास अर्ज येतील अशी परिस्थिती ठिकठिकाणी बघायला मिळत असते.

मोठी स्पर्धा अलिकडच्या काळात दिसून येत आहे. त्यात शासकीय नोकरी म्हंटलं तर त्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, नुकत्याच नाशिक महानगर पालिकेने उपकेंद्रांसाठी काढलेल्या भरती प्रक्रियेला अल्पप्रतिसाद मिळाला आहे. आकडेवारी पाहून अक्षरशः पालिकेने काढलेली जाहिरात चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्ये 106 जागांसाठी फक्त 60 अर्ज आले होते. आणि त्यापैकी फक्त दहा जणांनी अर्ज केले होते. त्यामुळे पालिकेच्या जाहिरातीकडे डॉक्टरांनी पाठ फिरवली का? डॉक्टरांचा वाणवा आहे? अशी उलट सुलट चर्चा होत आहे.

Google Ad

नाशिक महानगर पालिकेने मागील दोन महिन्यांपूर्वी एमबीबीएस पदवी असलेल्या डॉक्टरांसाठी भरती प्रक्रिया काढली होती. त्यामध्ये 106 जागा होत्या. शहरात वाढणारी लोकसंख्या बघता उपकेंद्राच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरवण्यासाठी नाशिक महानगर पालिकेने ही जाहिरात प्रतिसाद केली होती.

106 जागांसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीला हजारो एमबीबीएसची पदवी घेतलेले डॉक्टर अर्ज करतील असा पालिकेचा अंदाज होता. मात्र, त्या उलट घडलं. फक्त 60 एमबीबीएसची पदवी असलेल्या उमेदवारांनी अर्ज केले. मात्र मुलाखतीसाठी अवघ्या दहाच उमेदवारांनी हजेरी लावली.

खरंतर एमबीबीएसचे शिक्षण घेऊन पालिकेत नोकरी मिळत असेल तर अनेकांची त्याला पसंती असेल असा एक अंदाज बांधला गेला होता. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे अर्ज सुद्धा अनेकांनी भरले नाहीत. अवघी साठच जणांनी अर्ज भरल्याने पालिकेची जाहिरात डॉक्टरांना योग्य वाटली नाही असेही बोलले जात आहे.

तर दुसरीकडे पालिकेतून मिळणारा पगार आणि त्यापेक्षा शिक्षणासाठी लागणारा पैसा आणि बाहेर सुरू केलेले क्लिनिक बघता त्यातून जास्त पैसा मिळू शकतो त्यामुळेही एमबीबीएस डॉक्टरांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे पालिकेच्या भरती प्रक्रियेला मिळालेला अल्पप्रतिसाद पाहता पुढे काय निर्णय घ्यायचा याबाबत प्राथमिक स्तरावर निष्कर्ष काढला जात आहे.पालिकेतील नोकरी करण्यासाठी अनेक जण प्रयत्नशील असतात. मात्र इथे उलटच घडल्याने नेमकं कुठे काय चुकलं याबाबत विविध प्रकारचे तर्क लावले जात आहे. त्यामुळे अंतिम नाशिक महानगर पालिकेकडून याबाबत काय निवेदन सादर केले जाते याकडे आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींचे लक्ष लागून आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!