महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ एप्रिल) : जर मुंबई शहराची लाईफलाइन लोकल रेल्वे असेल तर पिंपरी चिंचवड शहराची लाईफलाईन हा जुना मुंबई पुणे हायवे आहे. कारण त्याच हायवे लगत सर्व रेल्वे स्टेशन व मेट्रो स्टेशन आहेत.पिंपरी चिंचवड शहराचा मानबिंदु असलेल्या हा मुंबई पुणे जुन्या हायवे चे अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार सुशोभीकरण करण्याच्या कामाची आढावा बैठक आज घेण्यात आली.भक्ती शक्ती पासून ते दापोडी पर्यत च्या 12 किमी रस्त्याचे सुशोभीकरण होणार आहे.
सदर काम हे दापोडी ते एम्पायर इस्टेट व एम्पायर इस्टेट ते भक्तीशक्ती या दोन टप्प्यात होणार आहे.हायवे रस्त्याच्या दरम्यान असलेल्या रहिवाशी भागात नागरिकांसाठी पादचारी मार्ग,गार्डन,छोटा कॅफेटेरिया,सुशोभित पथदिवे,जेष्ठ नागरिकांसाठी बाकडे, सायकल ट्रॅक,सुलभ शौचालय या व अशा सोयी सुविधांनी युक्त हा मार्ग असणार आहे.त्यामुळे शहराचे रूप बदलले आपल्याला पहावयास मिळणार आहे.
आजच्या या आढावा बैठकीदरम्यान पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे,कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड,कनिष्ठ अभियंता संतोष कुदळे,विद्युत अभियंता गलबले,मॅप्स ग्लोबल सिव्हीक टेक लिमिटेड चे संचालक अरविंद पाटील,प्रसन्न देसाई अँड आर्किटेक्ट चे अजिंक्य देसाई, शुभश्री देसाई यांनी संपूर्ण कामाचा अहवाल सादर केला यावेळी मा नगरसेवक प्रसाद शेट्टी,सामाजिक कार्यकर्ते निलेश शिंदे,अतुल भोंडवे,प्रशांत घुमटकर उपस्थित होते.