Categories: Editor Choice

आध्यात्मिकता व मानवता संगे संगे असा संदेश देणाऱ्या ७५ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा समारोप

आध्यात्मिकता व मानवता संगे संगे असा संदेश देणाऱ्या
७५ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा समारोप
पुण्यासह महाराष्ट्रातून हजारो भक्तगण सहभागी
जगामध्ये शांती व प्रेम पसरवत जावे – सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज

सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांना गांधी ग्लोबल फैमिलीकडून शांतिदूत सन्मान प्रदान

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ नोव्हेंबर) : ‘‘स्वतःला शांती व प्रेमाचे प्रतिरूप बनवून अवघ्या जगामध्ये या दिव्य भावना जगभर पसरवत जावे’’ असे उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी ७५व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या समापन सत्रामध्ये देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने सहभागी झालेल्या विशाल मानव परिवाराला संबोधित करताना काढले. या समागमामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भक्तगण आले होते.

या संत समागमामध्ये भोसरी, पिंपरी, काळेवाडी, रुपीनगर, येरवडा, कात्रज, गंगाधाम, हडपसर , कोथरूड, पुणे तसेच संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोखोंच्या संख्येने निरंकारी भक्तजन उपस्थित झाले होते.

सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांना गांधी ग्लोबल फैमिलीकडून शांतिदूत सन्मान प्रदान
समागमाच्या चौथ्या दिवशी चालू असलेल्या सत्संग समारोहाच्या दरम्यान गांधी ग्लोबल फैमिली मार्फत सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांना शांतिदूत सन्मान प्रदान करुन विभूषित करण्यात आले. गांधी ग्लोबल फैमिलीचे अध्यक्ष पद्मभूषण गुलाम नबी आज़ाद यांनी मुख्य मंचावर विराजमान सद्गुरु माताजींना आपल्या करकमलांद्वारे हा सन्मान प्रदान केला. याप्रसंगी सदर संस्थेचे उपाध्यक्ष पद्मश्री डॉ.एस.पी.वर्मा उपस्थित होते.

सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी आपल्या आशीर्वचनाद्वारे प्रेम, शांती व मानवतेचा दिव्य संदेश प्रसारित करणाऱ्या या पाच दिवसीय समागमाची यशस्वी सांगता झाली. भव्य-दिव्य रूपात आयोजित करण्यात आलेल्या ७५व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या आयोजनाने समालखा (हरियाणा) येथील संत निरंकारी आध्यात्मिक स्थळाचे प्रांगण श्रद्धा, भक्ति व प्रेमाच्या दिव्य प्रकाशाने आलोकित झाले होते. अध्यात्माच्या या पावन व मनोहारी उत्सवामध्ये सहभागी होऊन भक्तगण आनंदविभोर झाले होते. दिनांक १६ ते २० नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत या संत समागमाचे आयोजन करण्यात आले होते.

पहिला दिवस, सेवादल रॅली
संत निरंकारी मिशनच्या इतिहासामध्ये असे प्रथमच घडले, की समागमातील एक पूर्ण दिवस सेवादलासाठी समर्पित करण्यात आला. या रॅलीमध्ये देश-विदेशातून सहभागी झालेल्या सेवादल महिला व पुरुष स्वयंसेवकांनी शारीरिक कवायती व्यतिरिक्त खेळ, मानवी मनोरे, मल्लखांब यांसारखे कार्यक्रम सादर केले. याशिवाय समागमाचा मुख्य विषय असलेल्या ‘आत्मिकता व मानवता’ या विषयावर लघुनाटिका, व्याख्यान, भक्तिरचना इ. सादर केले.

सद्गुरु माताजींनी सेवादल रॅलीला आपले पावन आशीर्वाद प्रदान करताना सांगितले, की सेवादार भक्त जेव्हा सृष्टीच्या सृजनहाराशी एकरुप होऊन ज्या ज्या जबाबदाऱ्या पार पाडतो त्या सर्व भक्ती बनून जातात.

दुसरा दिवस
समागमाच्या दुसऱ्या दिवशी सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि त्यांचे जीवनसाथी निरंकारी राजपिता रमित जी यांचे समागम स्थळावर आगमन होताच समागम समितीच्या सदस्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत केले आणि एका फुलांनी सुशोभित केलेल्या खुल्या वाहनाद्वारे या दिव्य जोडीला समागमाच्या मुख्य मंचापर्यंत नेण्यात आले. या प्रसंगी उपस्थित भक्तगणांनी त्यांचे भावपूर्ण अभिवादन केले. सद्गुरूंच्या साक्षात दर्शनाने भक्तगणांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू तरळत होते.


मुख्य मंचावर विराजमान झाल्यानंतर सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी मानवतेच्या नावे संदेश दिला. त्यानंतर सायंकाळी सत्संगाच्या मुख्य सत्राला संबोधित करताना सद्गुरु माताजी म्हणाल्या की, परमात्म्याच्या प्रति निःस्वार्थ प्रेम हीच खरी भक्ती असून अशीच निरपेक्ष भक्ती संत महात्मा करत असतात. ज्याप्रमाणे एका लहानशा बीजामध्ये मोठा छायादार वृक्ष बनण्याची क्षमता असते त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्य हा परमात्म्याचा अंश असल्याने त्याच्यामध्ये परमात्मस्वरूप होण्याची क्षमता असते. बीज जेव्हा मातीत मिसळून अंकुरित होते आणि पुढे त्याचा वृक्ष बनतो तेव्हा वृक्षाकडून अपेक्षित असलेली सर्व कार्ये तो उत्तमप्रकारे पार पाडत असतो. अशाच प्रकारे ब्रह्मज्ञानाद्वारे मनुष्य जेव्हा परमात्म्याशी तादात्म्य पावतो आणि त्याच्या रंगामध्ये रंगून जातो तेव्हा तो स्वयमेव मानवी गुणांनी युक्त होऊन यथार्थ मनुष्य बनतो. त्यानंतर त्याच्या जीवनात आत्मिकता आणि मानवता यांचा सुरेख संगम पहायला मिळतो.

तिसरा दिवस
समागमाच्या तिसऱ्या दिवशी सत्संगाच्या मुख्य सत्राला संबोधित करताना सद्गुरु माताजींनी मनुष्य जीवनाचे महत्त्व समजावून सांगताना म्हटले, की जीवनातील प्रत्येक क्षण अनमोल आहे. असे अमूल्य जीवन वृथा न दवडता त्याचा सदुपयोग करुन ते लाभदायक बनवावे. कुटुंब आणि समाजाच्या प्रति असलेली कर्तव्ये पार पाडत असतानाच एक पाऊल पुढे टाकून आत्मपरीक्षण करावे आणि आपले जीवन आहे त्यापेक्षा अधिक सुंदर बनवावे. स्वतःचे जीवन सुंदर व सुखमय करत असतानाच इतरांचे जीवन सुखमय करण्यासाठी आपले सकारात्मक योगदान द्यावे. खरे पाहता आध्यात्मिकतेने युक्त जीवन जगण्यासाठी आपण मनुष्य देहामध्ये आलो आहोत. ही बाब प्रमाणित करण्यासाठी ‘आत्मिकता व मानवता संगे संगे’ असलेले समाधानयुक्त सफल जीवन जगावे.

चौथा दिवस
समागमाच्या चौथ्या दिवशी सत्संग समारोहामध्ये उपस्थित विशाल मानव परिवाराला संबोधित करताना सद्गुरु माताजींनी प्रतिपादन केले, की आध्यात्मिकता ही मानवाच्या आंतरिक अवस्थेत परिवर्तन घडवून आणते ज्यायोगे मानवतेला सुंदर रूप प्राप्त होते. मनाच्या अवस्थेवर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले, की मनामध्ये जेव्हा या निराकार प्रभूचा निवास होतो तेव्हा अज्ञानरुपी अंधार नाहीसा होतो आणि मनातील समस्त दुर्भावनांचा अंत होतो.

कवि दरबार
समागमाच्या चौथ्या दिवसाचे मुख्य आकर्षण होते एक बहुभाषी कवी दरबार. या कवी दरबारामध्ये ‘आत्मिकता व मानवता संगे संगे’ या शीर्षकावर आधारित देश विदेशातून आलेल्या 22 कवींनी हिंदी, पंजाबी, उर्दू, हरियाणवी, मुलतानी, इंग्रजी, मराठी व गुजराती भाषांच्या माध्यमातून सारगर्भित भावनांनी युक्त कविता सादर केल्या.

संत समागमातील अन्य आकर्षणे
निरंकारी प्रदर्शनी
संत समागमामध्ये यावर्षी लावण्यात आलेल्या निरंकारी प्रदर्शनीमध्ये प्रामुख्याने आजवरच्या ७५ संत समागमांचा इतिहास मॉडेल्स, तैलचित्रे, प्रत्यक्ष नाटिका तसेच दृकश्राव्य माध्यमातून दर्शविण्यात आला होता. यावर्षी निरंकारी प्रदर्शनीमध्ये ६ मुख्य दालने होती. त्यामध्ये एक मुख्य प्रदर्शनी, स्टुडिओ डिव्हाईन, बाल प्रदर्शनी, आरोग्य आणि समाज कल्याण विभाग प्रदर्शनी, थिएटर आणि डिझाईन स्टुडिओ आदिंचा समावेश होता. कायरोप्रॅक्टिक शिबिर
निरंकारी संत समागमातील विविध उपक्रमांमध्ये कायरोप्रॅक्टिक शिबिर भक्तगणांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. कायरोप्रॅक्टिक थेरपीमध्ये विशेष करुन मांसपेशी तसेच सांधेदुखीच्या त्रासावर उपचार केले जातात. मागील जवळ जवळ १० वर्षांपासून निरंकारी संत समागमामध्ये या शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये दररोज शेकडो गरजू उपचार प्राप्त करुन लाभान्वित होत आहेत. सदर शिबिरामध्ये विविध देशांतून जवळजवळ ५५ कायरोप्रॅक्टिक विशेषज्ञ आपल्या निष्काम सेवेद्वारे गरजू लोकांवर उपचार करत आहेत. त्यामध्ये कॅनडा, यूएसए, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, चीन, तैवान व स्वित्झरलॅन्ड इत्यादि देशांमधीले विशेषज्ञांचा समावेश आहे.

डॉक्युमेंटरी
निरंकारी संत समागमांचा इतिहास आणि पूर्वीच्या गुरुंनी व संतांनी दिलेल्या महान योगदानांचा सचित्र आढावा घेणारी एक डॉक्युमेंटरी समागमाच्या दरम्यान दृकश्राव्य माध्यमातून तीन भागांमध्ये दाखविण्यात आली ती पाहून उपस्थित भक्तगण समागमांचा दैदिप्यमान इतिहास पाहून अत्यंत प्रभावित झाले.

Maharashtra14 News

Recent Posts

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

3 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

3 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

4 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

4 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago

पावणेचार लाखांच्या मताधिक्याने मावळची निवडून जिंकू; पत्रकार परिषदेत संजोग वाघेरे पाटील यांचा विश्वास

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 17 (प्रतिनिधी) - जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली तशी प्रचारात रंगत…

1 week ago