Google Ad
Editor Choice

संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर, पुणे येथे ५ जानेवारी २०२३ रोजी “२९ वे मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबीर”

भारतीय जैन संघटना, पुणे, यांच्या वतीने २९ वे मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबीर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २९ डिसेंबर) : भारतीय जैन संघटना, संचेती हॉस्पिटल, पुणे व चांदमल मुनोत (नेवासकर) पब्लिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने “२९ वे मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबीर” दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आले असल्याचे संचेती हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. पराग संचेती, भारतीय जैन संघटनेचे संस्थपाक श्री. शांतिलाल मुथ्था व चांदमल मुनोत (नेवासकर) पब्लिक ट्रस्टचे अध्यक्ष श्री. हस्तीमलजी मुनोत यांनी कळविले आहे.

Google Ad

विश्वविख्यात प्लॅस्टिक सर्जन स्वर्गीय डॉ. शरदकुमार दिक्षित (अमेरिका) यांनी भारतात येऊन २,८८००० पेक्षा जास्त मोफत प्लास्टिक सर्जरी केल्या होत्या आता मागील ११ वर्षापासून यांच्या स्मरणार्थ देशभरात या शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. मानवसेवेचा हा महायज्ञ त्यांचे अमेरिकेतील सुशिष्य प्रसिध्द प्लॅस्टिक सर्जन डॉ. लॅरी वेइंस्टन, डॉ. बॅरी सिट्रॉन, डॉ.लॉरेन्स ब्रेनर, लिंडा पॅटरसन यांनी गेल्या ११ वर्षापासून पुढे चालू ठेवला आहे. येत्या ५ ते ८ जानेवारी २०२३ च्या शिबिरामध्ये अंदाजे २०० ते ३०० रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

या शिबिरामध्ये मुख्यत्वे करून दुभंगलेले ओंठ, नाक व कान यावरील बाह्यव्यंग, पापण्यातील विकृती, चिकटलेली हाताची बोटे, फुगलेले गाल अश्या प्रकारच्या सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार असल्याचे शिबीर प्रमुख श्री शशिकांत मुनोत यांनी कळविले आहे. कोविड प्रोटोकॉल मुळे यावर्षी चेहऱ्यावरील व्रण व डाग यावर शस्त्रक्रिया होणार नाहीत.

रुग्णांची नोंदणी व तपासणी फक्त गुरुवारी दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९.०० ते २.०० पर्यंत होणार असून दिनांक ६-७-८ जानेवारी रोजी निवडलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करणार येणार आहेत.

अधिक माहितीसाठी श्री विजय पारख (98224 24316) व श्री राजेंद्र सुराणा (93710 23161)
श्री. विरेश छाजेड (8379055759)यांच्याशी संपर्क साधावा.

वरील माहिती अधिकाधिक गरजू व्यक्तीपर्यंत पोहचवावी असे विरेश छाजेड जिल्हाध्यक्ष, भारतीय जैन संघटना, पिंपरी चिंचवड यांनी कळविले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!