🤺🏆 पहिल्या राष्ट्रीय मर्दानी खेळ स्पर्धा – २०२२ यशस्वी रित्या संपन्न 🏆🤺
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ जानेवारी २०२३) : महाराष्ट्र राज्याचा पारंपरिक मर्दानी खेळ याच्या राष्ट्रीय स्पर्धा केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल आकुर्डी, पिंपरी चिंचवड येथे मर्दानी खेळ असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आल्या. यामध्ये भारत देशातील विविध राज्यांमधील २१० खेळाडू सहभागी झाले होते.
या स्पर्धेत लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा, भाला, काठीची लढत (फरी गदगा) या खेळांमध्ये खेळाडू सहभागी झाले होते. तमिळनाडू, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब, कर्नाटका या राज्यातील खेळाडूंनी देखील आँनलाईन सहभाग नोंदवित पदक मिळविले.
भारताचे पहिले पॅरा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते पद्मश्री मुरलीकांत पेटकर, सरसेनापती हंबिरराव मोहिते यांचे थेट वंशज राजेंद्र मोहिते, नरविर तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार कुणाल मालुसरे, अक्षय बांदल, केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल चे संस्थापक चेअरमन धनंजय वर्णेकर, राम रैना आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पंच म्हणून सुदर्शन सुर्यवंशी, रविराज चखाले, अंजली बर्वे, निलम कांबळे, अर्चना अडागळे, अर्सीता सिंग, श्रेया दंडे, गणेश चखाले, रुपाली चखाले यांनी उत्तम कामगिरी केली.
मर्दानी खेळ असोसिएशन, महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष संजय बनसोडे, सचिव किरण अडागळे, खजिनदार स्मिता धिवार, स्थापना कमिटी सदस्य हेमंत कोकाटे यांनी उत्तम प्रकारे नियोजन केले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना -…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप - शिवसेना -…