Google Ad
Uncategorized

पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने पिंपरी भागातील नदीकाठच्या रहिवाशांना सजगतेचा इशारा दिला पिंपळे गुरव, पिंपळे निळख,संजय गांधी नगर पिंपरी , भाट नगर परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

महाराष्ट्र 14 न्यूज, दि .20 ऑगस्ट —पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने पिंपरी भागातील नदीकाठच्या रहिवाशांना सजगतेचा इशारा दिला जात आहे.

रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास संजयगांधीनगर पिंपरी येथील ६ जण कमला नेहरू शाळा येथे स्थलांतरित झाले आहेत, तर उर्वरित नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे.पिंपळे निलख पंचशीलनगर २५ जण मनपा शाळा येथे, तर पिंपळे गुरव लक्ष्मीनगर येथे ४५ जण मनपा शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहेत.

Google Ad

चिंचवडगाव सुरेश भोईर यांच्या कार्यालयाजवळच्या ४० जणांना स्थलांतरित करण्यात येत आहे
काळेवाडी येथे आवाहन करण्यात येत आहे.रामनगर बोपखेल येथील ४० जणांना मनपा शाळेत स्थलांतरित केले..

संजय गांधी नगर अंदाजे २५ लोक शिफ्ट झाले आहेत. १० लोक शाळेत गेले. इतर नातेवाईकांकडे गेले.

F zone येथे QRT टीम तैनात आहेत,
अद्याप या कार्यक्षेत्रात कोणत्याही नागरिकांना शिफ्ट करण्याची गरज भासली नाही.तसेच टाउन हॉल परिसरात जेसीबी मजुरांसह आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी तैनात ठेवण्यात आला आहे

रात्री 1.25 च्या सुमारास खबरदारीचा उपाय म्हणून, पंचशीलनगर, पिंपळे नीलख परिसरातील १४ जणांचा समावेश असलेल्या ५ कुटुंबांना जवळच्या महानगरपालिका शाळेत हलवण्यात आले आहे.
तसेच ३४ जणांचा समावेश असलेल्या १२ कुटुंबांना लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव परिसरातील जवळच्या महानगरपालिका शाळेत हलवण्यात आले आहे.

रात्री 2 वाजण्याच्या सुमारास भाट नगर परिसरातील १५० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे…. F.I.P.

Ad3
ad2
ad1
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!