Google Ad
Uncategorized

बारावीची परीक्षा होणार दोनदा, तर नववी, अकरावीच्या परीक्षेतही बदल!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० एप्रिल) : दहावी आणि बारावीच्या वार्षिक परीक्षेत मिळालेल्या गुणांमध्ये आता आधीच्या वर्षाचे गुण मिळवले जाणार आहेत.

तसेच सीबीएसई सारख्या केंद्रीय मंडळाच्या परीक्षा पद्धतीत समन्वय साधून बारावीची परीक्षा दोनदा घेण्याचे नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी नवीन शिक्षण धोरणानुसार राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रम मसुदा सरकारने तयार केला आहे.

Google Ad

मसुद्यात अनेक प्रकारच्या नवीन शिफारसी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार नवीन मूल्यांकन पद्धती विकसित केल्या जाणार आहेत. तर पदवीच्या अभ्यासक्रमातही अमुलाग्र बदल केले जाणार असून, नवीन पद्धतीत विद्यार्थ्यांना विषय निवडण्याचे मुभा मिळणार आहे. या नव्या शिफारशीत देशभरात वर्ष २०२३-२४ च्या दहावी बारावीच्या परीक्षेपासून सीबीएसई मंडळाच्या परीक्षा मूल्यांकन पद्धतीत बदल केले जाणार आहेत. त्यात लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रश्नांचे महत्त्वही कमी केले जाणार असून, सुमारे ५० टक्के प्रश्नपत्रिका ही बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित असेल.

दुसरीकडे राज्यातही बारावीच्या परीक्षा या वर्णनात्मक व वैकल्पिक अशा दोन पद्धतीने होऊ शकतील. सरकार त्यावर येत्या काळात निर्णय घेईल. राज्यातील शिक्षण क्षेत्रातील आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांकडून त्यावर सूचना मागण्यात येतील. दहावीमध्ये एकूण प्रश्नांपैकी ५० टक्के प्रश्न बहुपर्यायी असतील. एखाद्या घटनेवर किंवा इतर कोणत्याही समस्येवर आधारित प्रश्न विचारले जातील. वस्तुनिष्ठ प्रश्नांचा भाग केवळ वीस टक्के, लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रश्न यंदा ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले. तर दुसरीकडे बारावीत ४० टक्के व प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. एकात्मिक स्वरूपाचे व केस स्टडीवर आधारित प्रश्न विचारले जातील. लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रश्नांचे प्रमाण यंदा ४० टक्क्यांवर आणले आहे.

नववी, अकरावीच्या परीक्षेतही बदल
नववी आणि अकरावीच्या परीक्षेतही विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर आधारित प्रश्न विचारण्यात येणार असून, लघु आणि दीर्घ प्रश्न प्रकारच्या प्रश्नांचे महत्त्व कमी करण्यात येणार आहे. लघु आणि दीर्घ प्रश्न उत्तराच्या एकत्रित प्रश्नांना ५० ऐवजी चाळीस गुण असतील असे सीबीएसई मंडळाने म्हटले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!