Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिं. चिं.चिखली प्राधिकरण येथिल घरकुल योजनेतील प्राधान्य यादीतील १२९ लाभार्थीना ३१ मे २०२१ पर्यंत रक्कम भरणेसाठी मुदतवाढ

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ मे) : चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जे एन एन यु आर एम अभियानांतर्गत राबविणेत येत असलेल्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी से.नं .१७ व १९ चिखली प्राधिकरण येथिल घरकुल योजनेतील प्राधान्य यादीतील १२९ लाभार्थीनी उर्वरित स्वहिस्सा र.रु .३,२६,००० / भरलेला नाही त्यांना ३१ मे २०२१ पर्यंत रक्कम भरणेसाठी मा.आयुक्त राजेश पाटील यांनी मुदतवाढ दिली आहे .

तरी लाभार्थ्यांनी ३१ मे २०२१ पर्यंत उर्वरित स्वहिस्सा र.रु .३,२६,००० / – भरावा अन्यथा त्यांचा लाभ रदद करणेत येईल , असे आवाहन करण्यात आले आहे .

Google Ad

या मुदतीनंतर कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ देण्यात येणार नाही.तसेच घरकुल लाभार्थी यांचा घरकुल योजना अर्ज दफ्तरी दाखल करणेत येऊन घरकुल मिळणेबाबतचा हक्क मुदतीनंतर संपुष्टात येईल , तदनंतर कोणतीही तक्रार विचारात घेणेत येणार नाही व घरकुल योजनेतील यादीतील नाव कायम स्वरुपी रद्द करुन पुढील प्रतिक्षा यादीतील लाभार्थीचा विचार करणेत येईल याची स्पष्ट नोंद घ्यावी . असे अण्णा बोदडे सहा.आयुक्त ( झोनिपु ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी यांनी कळविले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

53 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!