महाराष्ट्र 14 न्यूज, दि.28 ऑगस्ट : पिंपळे गुरव येथील श्री गजानन महाराज यांची ११५ वी पुण्यतिथी व ऋषी पंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मंदिराच्या वतीने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पहाटे पासूनच मंदिरात श्री गजानन महाराजांची विधिवत पूजा, अभिषेक पूजा, आरती करण्यात आली. मंदिरात आणि मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी फुलांच्या माळांची सजावट करण्यात आली होती. प्रवेशद्वारावर भव्य रांगोळी साकारण्यात आली होती. दुपारी महाआरती तर सायंकाळी पिंपळे गुरव येथील गजानन महाराज महिला भजनी मंडळ मंदिरात सेवा देणार आहेत. भाविकांसाठी पिठलं भाकरीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमास आमदार शंकर जगताप हे उपस्थित होते.

यावेळी श्री गजानन महाराज यांच्या ११५ व्या पुण्यतिथी व ऋषी पंचमी निमित्ताचे औचित्य साधत मंदिराकरिता योगदान देणाऱ्या श्री. ज्ञानोबा जुन्नरकर यांचा यथोचित सन्मान आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. या दरम्यान गजानन महाराज चौकाच्या फलकाचे अनावरण देखील माजी आमदार अश्विनीताई जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मंदिराचे विश्वस्त शरद परदेशी, डॉ. प्रकाश चेन्ने, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, माजी नगरसेविका माधवी राजापुरे, श्रीकांत पवार, शांताराम डोईफोडे, सोमनाथ पाटील, सुभाष पवार, भरत ढोबळे, दादू कांबळे, सोमनाथ पाटील, विठ्ठल देवकर, पंकज ढोरे आणि परिसरातील भाविकभक्त उपस्थित होते.


