महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ जून) : महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी परीक्षेचा निकाल कधी लागणार याची विद्यार्थीसह पालक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर दहावी परीक्षेचा उद्या म्हणजेच 2 जून रोजी दुपारी 1 वाजला लागणार आहे.
महाराष्ट्र बोर्ड पुणे कार्यालयातून सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर करणार आहे.. Maharashtra Board Results Update News
राज्यातील एकूण विद्यार्थ्यांमध्ये ८ लाख, ४४ हजार, ११६ विद्यार्थी तर ७ लाख, ३३ हजार, ६७ विद्यार्थिनींनी दहावीची परीक्षा दिली होती. याशिवाय ८ हजार १८९ दिव्यांग विद्यार्थी व ७३ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. परीक्षेसाठी राज्यातील २३ हजार १० शाळांतून विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती.
निकाल कुठे पाहता येणार?
दहावी परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना http://mahresult.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागले. येथे विद्यार्थ्यांना तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरावी लागेल. यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षेचा निकाल त्यांच्या स्क्रीनवर दिसेल.निकाल बघण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचं हॉल तिकीट आवश्यक असणार आहे. त्यानंतर तुमचा रोल नंबर नीट बघून एंटर करणं आवश्यक आहे. आईचं नाव हे तुम्हाला इंग्लिशमध्ये टाईप करावं लागणार आहे. त्यानंतर येणारं बेसिक बेरीज किंवा वजाबाकीचं गणित सोडवून तुम्हाला निकाल बघता येणार आहे.