Google Ad
Editor Choice Education

SSC बोर्ड बरोबर CBSC Board,ICSC Board अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील / महाविद्यालयातील १० वी.,१२ वी. विदयार्थी / विदयार्थीनींना देखील पिंपरी चिंचवड मनपाच्या बक्षीस योजनांचा लाभ … ३१ नोव्हेंबर पर्यंत मुदत वाढ

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ नोव्हेंबर) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत विविध प्रकारच्या लोक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.त्यामध्ये इतरकल्याणकारी योजने अंतर्गत इ. १०वी मध्ये ८०% ते ९०% व ९०% पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या महाराष्ट्र राज्य्‍ मंडळ ( SSC Board) अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील व शिक्षण हक्क कायदा (Right to Education Act) अंतर्गत शाळांमधील विदयार्थी / विदयार्थीनींना बक्षीस रक्कम देणे.

व इ. १२वी मध्ये ९०% पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या महाराष्ट्र राज्य मंडळ (HSC Board) अंतर्गत महाविद्यालयातील विदयार्थी / विदयार्थीनींना बक्षीस रक्कम देणे, या योजनेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरणे व स्विकृती दिनांक ०१/०८/२०२२ ते दिनांक . ३१/१०/२०२२ अशी होती. परंतू सदरची मुदत ३०/११/२०२२ पर्यत वाढविण्यात आली आहे.विदयार्थी अणि पालक यांच्या मागणी नुसार योजने मध्ये सुधारीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार CBSC Board,ICSC Board अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील / महाविद्यालयातील विदयार्थी / विदयार्थीनींना देखील या योजनांचा लाभ देणेत येणार आहे.

Google Ad

या योजनेच्या नमुद केलेल्या अटी व शर्तीनुसार आवश्यक ती कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे. सदरचे ऑनलाईन पध्दतीने भरावयाचे अर्ज अर्जदार व्यक्ती, मोबाईल, लॅपटॉप, संगणक किंवा नागरी सुविधा केंद्रांमार्फत विहीत शुल्क भरुन देखील भरता येतील.तसेच लवकरच वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करणेकामी जाहिरप्रकटन प्रसिद्धी करणेत येईल.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!