महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ जुलै २०२३) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी येथील छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूलमधील १० विद्यार्थी १९ जुलैपासून जर्मनीतील हेलब्रॉन येथे शाश्वत विकास उद्दिष्टांवर होणाऱ्या दोन दिवसीय युवा परिषदेला उपस्थित राहणार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यशाळेत सहभागी होण्याची शहरातील विद्यार्थ्यांची ही पहिलीच वेळ आहे.
दहा दिवसांच्या या अभ्यासदौऱ्यात विद्यार्थ्यांना त्यांनी केलेले कार्य परदेशातील शिक्षकांसमोर आणि विद्यार्थ्यांसमोर सादर करण्याची संधी मिळणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून संयुक्त राष्ट्राने नेमून दिलेल्या शाश्वत विकास प्रकल्पाअंतर्गत महापालिकेच्या शाळेसोबत आकांक्षा फाउंडेशन संस्था संयुक्तपणे काम करत आहे. या प्रकल्पातील जलसंरक्षण, स्वच्छता या विषयांवर शाळेतील विद्यार्थी काम करत आहेत. जलसंरक्षण आणि संवर्धनासाठी या शहरामध्ये जनजागृती करणे, प्रदर्शनांचे आयोजन करणे, विविध आराखड्यांद्वारे पाणी वाचविण्याची संकल्पना अंमलात आणणे तसेच स्वच्छतेसाठी कार्यक्रम आखणे असे विविध उपक्रम मागील दोन वर्षात विद्यार्थ्यांनी राबविले आहेत.
निवड झालेल्या इयत्ता ८ वी आणि ९ वीच्या विद्यार्थ्यांमध्ये ईशा पाटील, ताहुरा शेख, सई लांडगे, ताहुरा मणियार, श्रावणी टोंगे, क्षितीज गुजर, अथर्व भाईप, गौरव पवार, प्रथमेश जाधव आणि आयेशा मुस्तफा यांचा समावेश आहे.
छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मिडियम स्कूलचे मुख्याध्यापक पारिजात प्रकाश म्हणाले, जर्मनी, आफ्रिका, स्पेन, हंगेरी आणि ऑस्ट्रिया येथील विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या क्रॉस-कंट्री एक्सचेंज प्रकल्पाचा आमच्या शाळेतील विद्यार्थी गेल्या २ वर्षांपासून भाग आहेत. संयुक्त राष्ट्राने नेमून दिलेल्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांवर काम करणे या उद्देशातून शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षक वृंद गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत होते.
तसेच फ्रँकफर्टमधील आंतरराष्ट्रीय युवा परिषदेचाही भाग होण्यासाठी शाळेला आमंत्रण देण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्राने निर्धारित केलेल्या उद्दिष्टांवर सक्षमपणे काम करीत शाळेमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा तसेच प्रायोगिक तत्त्वावर बदल करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. विद्यार्थ्यांनी शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांबद्दल जागरूकता आणि जलसंधारण तसेच शाश्वत मार्गांसाठी गेल्या २ वर्षांत अथक परिश्रम घेतले आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेला सहभाग ही सुरूवात असून भविष्यात वेगवेगळ्या शाळांचा देखील अशा प्रकारे सहभाग होऊ शकतो, असा विश्वास मुख्याध्यापक पारिजात यांनी व्यक्त केला.
निवड झालेल्या १० विद्यार्थ्यांपैकी प्रतिक्रिया देताना गौरवची आई म्हणाली, इयत्ता पहिलीपासून तो महापालिकेच्या छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत आहे. आमच्या कुटुंबातील गौरव हा आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणारा पहिला सदस्य आहे. हे सर्व महापालिकेच्या आणि आकांक्षा फाउंडेशनच्या पाठिंब्याने शक्य झाले आहे.
मानव आणि ग्रहांसाठी तसेच भविष्यात शांतता आणि समृद्धीसाठी सामायिक ब्लूप्रिंट म्हणून १७ परस्परसंबंधित जागतिक उद्दिष्टांचा समावेश असलेल्या शाश्वत विकास उद्दिष्टे किंवा जागतिक उद्दिष्टांची रचना केली गेली आहे. संयुक्त राष्ट्र संघाद्वारे या उद्दिष्टांची निर्मिती करण्यात आली असून २०३० पर्यंत ते साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप मित्र परिवार आणि भाजपचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ मे : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…