महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ जानेवारी) : चिंचवड विधानसभा
मतदारसंघाचे दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे ०३ जानेवारी रोजी निधन झाले. आज शुक्रवारी (दि. ६) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी पिंपळे गुरव येथील निवासस्थानी येऊन जगताप कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला.
यावेळी त्यांच्या समवेत साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील होते. शरद पवार यांनी लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी जगताप कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच जगताप यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांची आस्थेवाईकपणे चौकशी देखील केली. या दुःखातून सावरण्यासाठी जगताप कुटुंबाला धीर दिला. दिवंगत लक्ष्मणभाऊ यांच्यासोबतच्या काहीजुन्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला.
यावेळी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, मुलगी ऐश्वर्या रेणुसे व बंधू शंकर जगताप, विजय जगताप, लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या भगिनी व इतर सर्व नातेवाईक मित्रमंडळी उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.09 ऑगस्ट : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील स्थानिक ग्रामपंचायतींनी गावठाणाच्या हद्दीत…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 08 ऑगस्ट :- रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक. यंदाचा रक्षाबंधन…
महाराष्ट्र 14 न्यूज, ७ ऑगस्ट - महापालिका प्रशासनाने देखील नागरिकांच्या समस्या समजून घेत त्या प्रभावीपणे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.07ऑगस्ट :- एम .जी देवकर एज्युकेशनल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट स्टार प्री स्कूल…
महाराष्ट्र 14 न्यूज पिंपरी, ७ ऑगस्ट, २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात एक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 07 ऑगस्ट -- राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वहायला…