अबब… फेब्रुवारी पासुन या मोबाईलवर चालणार नाही व्हाॅट्सअॅप !

मुंबई | सर्वांच्या स्मार्टफोनमधील अतिशय महत्वाचे अॅप म्हणजे व्हाॅट्सअॅप.. परंतु हे व्हाॅट्सअॅप जर आपल्या मोबाईल मध्ये चालायचे बंद झाले तर? काळजी करु नका व्हाॅट्सअॅप बंद होणार नाही पण ते काही मोबाईल मध्ये नक्कीच चालणार नाही. काही जुन्या स्मार्टफोन मध्ये आता व्हाॅट्सअॅप चालणार नाही.

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार जुने अँड्राॅइड व्हर्जन असलेल्या मोबाईलवर फेब्रुवारी २०२० पासुन व्हाॅट्सअॅप चालु शकणार नाही. त्यासोबतच ॲपलच्या जुनी ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या स्मार्टफोन मध्ये सुद्धा फेब्रुवारी पासुन व्हाॅट्सअॅप हे ॲप्लिकेशन चालणार नाही.

चला पाहुयात कोणकोणत्या स्मार्टफोन फोन मध्ये व्हाॅट्सअॅप चालणार नाही.

१. अँड्रॉइड व्हर्जन 2.3.7 आणि त्यापेक्षा जुने व्हर्जन असलेल्या मोबाईल कोणत्याही स्मार्टफोन मध्ये १ फेब्रुवारी २०२० नंतर व्हाॅट्सअॅप चालणार नाही.

२. iOS 8 आणि त्यापेक्षा जुनी ॲपल ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या स्मार्टफोन मध्ये सुद्धा १ फेब्रुवारी २०२० पासुन व्हाॅट्सअॅप चालु शकणार नाही.

१ फेब्रुवारी पासुन या मोबाईलवर व्हाॅट्सअॅप डाऊनलोड किंवा इन्स्टाॅल करता येणार नाही. कदाचित व्हाॅट्सअॅप अगोदरपासुन चालु असेल तर ते काही दिवस तसेच चालु राहु शकते परंतु ते व्हेरीफाय करता येणार नाही किंवा अपडेटही करता येणार नाही.

Ad3
ad2
ad1

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!