Google Ad
Editor Choice

नवी सांगवीतील ‘ सत्ता प्रतिष्ठान’तर्फे … सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक सेवा सप्ताहाचे आयोजन!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ सप्टेंबर) : नवी सांगवी येथील सत्ता प्रतिष्ठानच्यावतीने गणेशोत्सवात सामाजिक सेवा सप्ताह राबविण्यात आला . यामध्ये वृक्षारोपण , रुग्णांना फळे व मास्क , सॅनिटायझर वाटप , वारकऱ्यांचा सन्मान आणि खासगी व शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिकांना कोरोना योद्धा पुरस्कार तसेच घंटागाडीवर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला . मंडळ नेहमीच असे समाजोपयोगी कार्यक्रम वर्षभर राबवत असते.

या सेवा सप्ताहात पिंपरी चिंचवड शहरातील अत्यंत आपल्या पोटाला चिमटा घेऊन, हलाखीचे जीवन जगत असलेल्या गरजू मोलकरणीच्या मुलांना कपडे व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले . तसेच नवी सांगवी परिसरातील गरजू व गरीब रिक्षा चालकांना सी . एन . जी . कुपनचे वाटपकेले .

Google Ad

यावेळी या सेवा सप्ताहात पिंपरी चिंचवड युवक सेवा दलाचे अध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, सुरेश सकट, विजेता फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ . श्वेता इंगळे , प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित जगदाळे , कार्याध्यक्ष अक्षय शिंदे , निखिल चव्हाण , प्रशांत कडलग आदींनी सहभाग घेतला, या कार्यक्रमाचे आयोजन सौरभ शिंदे यांनी केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

74 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!