Google Ad
Editor Choice Pune

जुनी सांगवी, दापोडी, पिंपळे निलख, वाकड गावांना दक्षतेचा इशारा … रविवारी १६ ऑगस्ट सकाळी ११ वाजता मुळशी धरणातून विसर्ग सुरू!

महाराष्ट्र 14 न्यूज : रविवारी १६ ऑगस्ट सकाळी ११ वाजता मुळशी धरणाच्या सांडव्यातून विसर्ग सुरू करण्यात येणार आहे . धरण पाणलोट क्षेत्रातील पय॑न्यमानानुसार त्यामध्ये वाढ संभवू शकते . त्यामुळे धरणाच्या खालील भागातील नदी काठची गावे , वाड्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदी पात्रात प्रवेश करू नये . विजेवरील मोटारी , इंजिने , शेती अवजारे अथवा तत्सम साहित्य तसेच , पशुधन यांचेही सुरक्षिततेची काळजी घेऊन कोणत्याही प्रकारे जीवीत वा वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी , असे आवाहन मुन्नोळी यांनी केले आहे .

मुळशी धरणातून रविवारी ( ता . १६ ऑगस्ट २०२० ) सकाळी अकरा वाजता विसर्ग सुरू केला जाणार आहे . त्यामुळे मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असून , नदी काठच्या जुनी सांगवी , दापोडी , वाकड, बोपखेल ,पिंपळे निलख पुण्यातील बाणेर, खडकी , बोपोडी , औंध गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे . याबाबत मुळशी धरण प्रमुख ( टाटा पॉवर ) बसवराज मुन्नोळी यांनी पुणे व पिंपरी – चिंचवड महापालिका पूर नियंत्रण कक्ष , पुणे – पिंपरी – चिंचवड , पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता , शाखा अभियंता पिरंगूट , मुळशी तहसीलदार मुळशी व पोलिसांना कळविले आहे .

Google Ad

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

1,682 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!