Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

‘बचतगट’ काळाची नवी गरज … नगरसेविका ‘सविता खुळे’ यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त केले २५ बचत गटांचे उद्घाटन!

महाराष्ट्र 14 न्यूज : संघटित ताकद व पारदर्शक सहकाराची प्रक्रिया जर एकत्र आली तर विविध प्रकारची उद्योजकता निर्माण होते आणि समाजाच्या प्रगतीला हातभार लावते. या चळवळीतून अनेक प्रकारचे उद्योग जन्माला येऊ शकतात हेच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन चिंचवड विधानसभेचे आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका सविता नरेश खुळे यांनी प्रभाग क्रमांक २७ मध्ये विविध ठिकाणी एकूण २५ महिला बचत गटांचे उद्घाटन केले.

Google Ad

यामध्ये जय तुळजाभवानी महिला बचत गट, श्री स्वामी समर्थ महिला बचत गट, साईराज महिला बचत गट, राम महिला बचत गट, स्वस्तिक महिला बचत गट, सानवी महिला बचत गट, बळीराज महिला बचत गट, जानकी महिला बचत गट, संजीवनी महिला बचत गट, राजमाता महिला बचत गट, स्वामिनी महिला बचत गट, मणकार्णिका महिला बचत गट, माऊली महिला बचत गट, ज्ञानेश्वरी महिला बचत गट, आनंदी महिला बचत गट, महेश्वरी महिला बचत गट, शिवशक्ती महिला बचत गट, आईसाहेब महिला बचत गट, सखी महिला बचत गट, श्री साई महिला बचत गट, राम सीता महिला बचत गट, स्वप्नपूर्ती महिला बचत गट, शांभवी महिला बचत गट, शाकंभरी महिला बचत, राधे कृष्ण महिला बचत गट इत्यादी महिला बचत गटांचे उद्घाटन खुळे यांनी केले.

यावेळी सविता खुळे म्हणाल्या, महिलांचे आर्थिक सबलीकरण व्हावे आणि महिलांना लहान मोठे उद्योग, व्यवसाय करता यावेत यासाठी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून स्वतंत्र व्यासपीठ मिळत आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देवून त्यांच्या हाताला रोजगार देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!