Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड मनपाच्या सेवाज्येष्ठ अधिकार्यांना पदोन्नती द्या … अन्यथा बेमुदत उपोषण – नगरसेवक राजू बनसोडे व पिंपरी युवासेनेची मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ऑक्टोबर) : राज्य शासनाने दिनांक २१.०६.२०२१ रोजी राज्य सरकारी कर्मचार्यांसाठी सेवा जेष्ठता अधिसूचना निर्गमित केली आहे.या नियमास ” महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन )नियमावली,२०२१ असे म्हटले आहे. त्याप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीसाठी पात्र असून सुद्धा कनिष्ठ अभियंता,उपअभियंता यांना अद्याप पदोन्नती दिली गेली नाही. कुठल्याही प्रकारच्या त्रुटी नसताना जाणून बुजून त्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे.

सेवाज्येष्ठतेनुसार पात्र असणारे अधिकारी यांची पदोन्नती जर होत नसेल तरी यापूर्वी केलेल्या १३ अधिकाऱ्यांना दिलेली पदोन्नती नियमबाह्य असून त्याबाबत सबळ पुरावे आहेत तरी त्यांच्या नियमबाह्य पदोन्नती रद्द करण्यात यावी अन्यथा जाणीवपूर्वक व सूडबुद्धीने थांबविण्यात आलेल्या पदोन्नतीच्या निषेधार्थ महापालिकेसमोर १ नोव्हेंबर पासून बेमुदत उपोषण करण्याबाबत निवेदन मा.आयुक्त राजेश पाटील यांना नगरसेवक राजू बनसोडे व पिंपरी युवाअधिकारी निलेश हाके यांच्या वतीने देण्यात आले.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

855 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!